Sanjay Gandhi Niradhar Yojana : दोन महिन्यांचे एकदाच 3000 रुपये लाभार्थ्यांना देण्यासाठी राज्य शासनाने जीआर निर्गमित करून हे 3000 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता दिली आहे. तेव्हा कोणकोणत्या दोन महिन्यांचे अनुदान आली आहे. आणि किती तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापना वेतन व वेतन इतर खर्चासाठी माहेर सप्टेंबर ते आक्टोंबर 2024 करिता अनुदानाचे वाटप करण्यास या जीआर च्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे.
Sanjay Gandhi Niradhar Yojana : तेव्हा खाली शासन निर्णय काय आहे. पहा सण २०२४२५ या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी 129 कोटी 19 लाख 52 हजार रुपये इतकी अनुदान तसेच वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी 51 कोटी 86 लाख 88 हजार रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे. तर यापैकी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दोन महिन्यांचे दीड हजार प्रमाणे 3000 रुपये देण्यासाठी 61 कोटी 69 लाख दहा हजार 960 इतकी रक्कम विभागीय आयुक्त कार्यालयांना माहेस सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 या दोन महिन्यांसाठी वितरित करण्यात आली आहे.
त्याच्यानंतर हे तीन हजार रुपये किती तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जातील तर पहा मागच्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला जमा करण्यात येतील तर त्यानुसार येत्या तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर हे दोन महिन्यांचे 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे.