Namo Farmer Scheme : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक दिलासादायक अपडेट देण्यात आलेला आहे. आता लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे. यासंदर्भात एक महत्त्वाचा ज्या राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे. नमो शेतकरी योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभदा करण्यासाठी रुपये 2254 कोटी 96 लाख इतका निधी वितरित करणे बाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून दिनांक ३० सप्टेंबर 2024 रोजी हा जीआर काढण्यात आलेला आहे.
Namo Farmer Scheme : सर्वात पहिल्यांदा या जीआरची प्रस्तावना काय आहे. पहा या प्रस्तावनेमध्ये स्पष्ट माहिती देण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुद्धा नमो शेतकरी महासंघ निधी योजना राबवलेले आहे. केंद्र शासनाप्रमाणेच वार्षिक सहा हजार रुपये नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केल्या जातात तसेच या ठिकाणी पाहू शकता हे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 यापूर्वीच्या हप्ता मधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2254 कोटी 96 लाख इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी शासन निर्णय सुद्धा तुम्ही पाहू शकता ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील पाचव्या हप्त्यासाठी ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.
केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 18 वा हप्ता दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील वाशिम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे. आणि याच पीएम किसान सन्माननीय नियोजनाच्या 18 व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेचा 5 हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे. नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित होऊन फक्त एक महिना झालेला आहे. फक्त एका महिन्याच्या कालावधीत नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचे दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत आहेत. कारण विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच राज्यांमध्ये लागू होणार आहे. आणि आचारसंहिता लागू होण्याच्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे वितरित केल्या जाणार आहेत.